पतीने का केला पत्नीवर चाकु हल्ला? 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

या प्रकरणात पती रमेश निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जे.एन.मोगल यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापूर : संशय घेऊन पत्नीवर चाकुने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अनुराधा रमेश निंबाळकर (वय 30, रा. वेणुगोपाल नगर, सोलापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर जेजे बुटीक शेजारी सार्वजनिक ठिकाणी घडली. 

याप्रकरणात पती रमेश निंबाळकर यास जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रमेश याने पत्नी अनुराधावर संशय घेऊन बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिच्यावर चाकूने वार केले. या घटनेत अनुराधाच्या पोटावर, पायावर, छातीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर प्रकाश सारंगी यांनी अनुराधा यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पती रमेश निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जे.एन.मोगल यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. अनुराधा ही वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील मिठाईच्या दुकानात कामाला आहेत तर तिचा पती रमेश हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो, असे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on wife