इचलकरंजीत तरूणांच्या दोन गटात राडा

राजेंद्र होळकर
शुक्रवार, 4 मे 2018

इचलकरंजी - येथील जयभिमनगरात तरुणाच्या दोन गटात भरदिवसा सशस्त्र राडा झाला. या राड्यामध्ये कोयते, काठ्या, दगड यांचा वापर करण्यात आला. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून, दोघेजण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

इचलकरंजी - येथील जयभिमनगरात तरुणाच्या दोन गटात भरदिवसा सशस्त्र राडा झाला. या राड्यामध्ये कोयते, काठ्या, दगड यांचा वापर करण्यात आला. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून, दोघेजण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचाराकरीता सांगली येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे.

या सशस्त्र राड्यामध्ये शहरातील एका राजकीय व्यक्तीच्या मुलग्यासह सुमारे 15 तरुणांचा सहभाग असल्याच्या माहिती पोलिस तपासामध्ये पुढे आली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्या संबंधीत राजकीय व्यक्तीच्या मुलास संशयावरुन ताब्यात घेतले आहे. तसेच यामध्ये अभय, उदय, नवनाथ, बापू, संतोष (सर्व रा. जयभिमनगर, इचलकरंजी) याचा मुख्य सहभाग असल्याचे पोलिसांना समजले आहे.

या सशस्त्र राड्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी व आयजीएम रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत काही संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा राडा आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला असून, यांचे नेमके कारण समजले नाही.

अजित उर्फ चिंमण ऐडके, किशोर अशोक शिंदे, नवनाथ प्रभाकर पारसे (सर्व रा.जयभिमनगर, इचलकरंजी) अशी जखमींची नावे आहेत. जखमी अजित उर्फ चिंमण ऐडके यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. यातील एक वार त्यांच्या छातीवर वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर किशोर शिंदे यांच्या पाठीवर तर नवनाथ पारसे यांच्या पार्श्‍वभागावर वार करण्यात आला आहे. या तिघांवर आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण अजित उर्फ चिंमण ऐडके हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचाराकरीता सांगली येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. 

 

Web Title: Kolahapur News quarrel in Ichalkaraji