कोल्हापूर विमानतळासाठी अडथळ्यांचे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

कोल्हापूर - येथील विमानतळाच्या 270 कोटी रुपयांच्या विकासकामांसाठीच्या अडथळ्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये विमानतळ विकासासाठी आवश्‍यक सर्व बाबींची पाहणी करून त्यांच्या छोट्याछोट्या नोंदी करण्याचे काम दोन अधिकारी दहा दिवसांपासून करत आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल हे अधिकारी "एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया'कडे (एएआय) लवकरच देतील.

सर्वेक्षणाचे हे काम म्हणजे विमानतळ सुरू होण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी अधिवेशनाच्या कालावधीतही दिल्लीदरबारी विमानतळाच्या प्रश्‍नाचा "एएआय'कडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दिल्ली व मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर 270 कोटी रुपयांचा प्रकल्प विमानतळ विकासासाठी घेण्याचे ठरविले. प्रकल्पासाठी आराखडा नेमक्‍या पद्धतीने बनविण्यासाठी याच्या सर्वेक्षणाचे काम होणे महत्त्वाचे असल्याने "एएआय'ने या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी अडथळा सर्वेक्षण करण्याचे ठरविले. 10 डिसेंबरपर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरू राहणार आहे.

Web Title: Kolhapur airport survey