कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाला दोन दिवसांत सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाला दोन दिवसांत प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आज महापालिका व देवस्थान समितीने किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्यास कालपासून प्रारंभ केला. काल महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी बैठकीला उपस्थित न राहिल्याने त्यांचा निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ अडथळे काढण्याचे आदेश दिले. 

दरम्यान, गुरुवार (ता.८) पासून किरणोत्सवातील किरणांचा सलग पाच दिवस अभ्यास होणार आहे. परंपरेनुसार ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान किरणोत्सव होतो. मात्र या तारखा काही कारणांनी बदलल्या आहेत का, याच्या अभ्यासासाठी या किरणोत्सवातही विविध नोंदी घेतल्या जाणार आहेत. 

मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा होतो. मात्र, गेल्या काही वर्षापासून मंदिर परिसरातील इमारतींवरील अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण तीव्रतेने झालेला नाही. याबाबत अभ्यास करण्यासाठी प्रशासनाने किरणोत्सव अभ्यास समितीही स्थापन केली.

समितीने अभ्यास करून मंदिरासमोरील ताराबाई रोड, महाद्वार रोड येथील इमारतींवरील अतिक्रमणामुळे किरणोत्सवात अडथळे येत असल्याचे सांगितले असून महापालिका कर्मचारी, देवस्थान समिती कर्मचारी, अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सामुदायिकपणे मोहीम राबवली. मार्गावरील एकूण सात मिळकतीवरील अडथळे या मोहिमेत काढण्यात आले. अभियंता सुदेश देशपांडे, एस. के. माने, पंडितराव पोवार, उमेश माने, हर्षला पुतळे आदींचा मोहिमेत सहभाग होता. 

विशेष खबरदारी...

गेल्या नोव्हेंबरमध्ये तब्बल पाच वर्षांनी किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने झाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील किरणोत्सवात पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणे आली. मात्र, तिसऱ्या दिवशी भाविकांची पूर्ण निराशा झाली. या पार्श्‍वभूमीवर यावेळी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: Kolhapur Ambabai kiranoushav starts within two days

टॅग्स