Bangladeshi Immigrant Verification
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Bangladesh immigration: कोल्हापूर जिल्ह्यात बांगलादेशींची चौकशी सुरू! राज्य सरकारच्या आदेशानंतर प्रशासन सज्ज. संशयास्पद अर्ज अद्याप नाहीत!
Bangladeshi Immigrant Verification: अर्जदार स्वतःच्या घरात राहतो की भाड्याने, याची खात्री करण्यासाठी पुरवठा निरीक्षकांकडून प्रत्यक्ष गृहचौकशी केली जात आहे. भाडेकरूंसाठी घरमालकाचे शपथपत्र आणि स्थलपुरावे आवश्यक आहेत.
कोल्हापूर: देशासह राज्यात बांगलादेशी घुसखोर नागरिकांचे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी मिळविलेल्या शासकीय प्रमाणपत्रांच्या आधारे योजनांच्या लाभासाठी ते विविध शासकीय कार्यालयांत अर्ज करत आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा खर्च अनावश्यक वाढत आहे.

