कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष वोरा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष बाबूभाई वोरा (वय ७३) यांचे आज मध्यरात्री निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

कोल्हापूर - भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष बाबूभाई वोरा (वय ७३) यांचे आज मध्यरात्री निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

वोरा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४६ रोजी झाला. बालपणीच त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला. संघामध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांच्याकडे जनसंघाची जबाबदारी देण्यात आली. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला. पुढे त्यांना भाजपचे जिल्हास्तरीय पद देण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कोल्हापूरमध्ये भाजपचा विस्तार केला. 

ते भाजपचे एकमेव नगरसेवक होते, तरीही ते स्थायी समिती सभापती झाले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही लढवली. बराच काळ ते पक्षाचे जिल्हा अध्यक्षही होते. युती सरकारच्या काळात ते राज्य परिवहन समितीवर सदस्य होते. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

सध्या ते पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य होते. कोल्हापूर जनशक्ती संघटना, हिंदू व्यासपीठ माध्यमातून ते सामाजिक जीवनात सक्रिय होते. त्यांनी कोल्हापुरातील नाट्य वितरण क्षेत्रातही भरीव योगदान दिले. सीमा लढ्यापासून जनआंदोलनांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur BJP Leader Subhash Vora no more