

child-begging rescue
sakal
कोल्हापूर: कोल्हापूर व इचलकरंजी शहरांत बालकांच्या मदतीने भिक्षा मागणाऱ्या व्यक्ती रोखण्यासाठी स्वतंत्र बालभिकारी शोध पथकाची स्थापना होणार आहे. जानेवारी २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होणार असून, शहरातून एखादी तक्रार आल्यास हे पथक तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून बालकांची भिक्षा मागण्यापासून मुक्तता केली जाणार आहे.