पन्हाळा पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदारास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - पन्हाळा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे काम न करणाऱ्या कंत्राटदाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली नोटीस द्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना आज दिला. 

कोल्हापूर - पन्हाळा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे काम न करणाऱ्या कंत्राटदाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली नोटीस द्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना आज दिला. 

आपत्तीग्रस्त भागातील नुकसानीबाबत सर्व विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

आपत्तीग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची माहिती उद्यापर्यंत सादर करावी, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची सविस्तर माहिती द्यावी. यामध्ये नुकसान कसे झाले याबाबत स्वतंत्र टिपणी जोडावी. इमारती, रस्ते, आरोग्य विभागाचे झालेले नुकसान, पाणी पुरवठा योजनेचे झालेले नुकसान, दरड ढासळून झालेले नुकसान असा समावेश असावा. आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या जनावरांसाठी खाद्य पुरवठ्याबाबत सिध्दीविनायक ट्रस्टला पत्र पाठवावे, अशा सूचना पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांना केल्या. बुरशी तसेच डास प्रतिबंधक फवारणी आपत्तीग्रस्त गावात करावी, यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशा सूचनाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांना दिल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Collector order to give notice to Panhala water distribution contractor