कोल्हापूर जिल्ह्यातील 1900 प्रकरणांत तोडगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत जिल्ह्यातील 28,679 पैकी 1900 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यश आले. त्यात सुमारे 10 कोटी रकमेची तडजोड झाली. लोक अदालतीत वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. प्रलंबित खटल्यांत मिळालेला न्याय आणि वेळ, श्रम पैशाची बचत झाल्याचे समाधान पक्षकारांच्या चेहऱ्यांवर दिसत होते. "न्याय आपल्या दारी' ही विधी सेवा प्राधिकरणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याच्या प्रतिक्रिया पक्षकारांनी दिल्या.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार आज न्याय संकुलात राष्ट्रीय लोक अदालत झाली. 15 पॅनेलच्या माध्यमातून याचे कामकाज चालले. बॅंक, महावितरण, मोबाइल कंपन्यांचेही दाखलपूर्व खटले अदालतीमध्ये होते. ग्राहक संरक्षण मंच, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालयाचेही स्वतंत्र पॅनेल होते. मोटार अपघात खटल्यांकरीता जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम आणि न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांची दोन पॅनेलद्वारे कामकाज चालले. मोटार अपघातातील प्रलंबित खटल्यात विमा कंपन्यांशी चर्चा करून 67 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यश आले. त्यात तीन कोटी 65 लाख 15 हजार 479 रुपयांची जडजोड झाली. जिल्ह्यातील एकूण प्रकरणापैकी 1900 प्रकरणे तडजोडीने मिटविली. त्यात नऊ कोटी 97 लाख 25 हजार 801 रुपयाची ऐतिहासिक रकमेची तडजोड करण्यात जिल्हा विधी प्राधिकरणाला यश आले.

राष्ट्रीय लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी मार्गदर्शन केले. सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, जिल्हा न्यायाधीश व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, अतुल धवडे, शैलेश पोवार, बाळासाहेब कुपरेकर, विधी स्वयंसेवक मयूरी आवलकर, युवराज आवलकर, रवी जाधव यांच्या परिश्रमातून ही लोक अदालत यशस्वी झाली.

Web Title: Kolhapur district in 1900 to resolve cases