#KolhapurFloods पूरग्रस्त छावण्यांतील बालकांमध्ये साथीचे आजार 

#KolhapurFloods पूरग्रस्त छावण्यांतील बालकांमध्ये साथीचे आजार 

जयसिंगपूर - शिरोळ तालुक्‍यातील प्रलंयकारी महापुरातील पूरग्रस्तांना शहरातील विविध छावण्यांमध्ये आधार देण्यासाठी जयसिंगपूरकर सरसावले आहेत. यात सुमारे सातशे बालकांचा समावेश असून बालकांमध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. न्यूमोनिया, गॅस्ट्रोची साथ उद्‌भवली असून उपचारासाठी जयसिंगपूर मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

असोसिएशनच्या बैठकीत ठरल्यानुसार शहरातील 130 डॉक्‍टर दररोज तीन तास पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा देत आहेत. दोन दिवसांत शहरासह विविध गावांमध्ये जाऊन आरोग्य सेवा दिली जात आहे. महसूल विभाग आणि असोसिएशनच्या समन्वयातून सेवा दिली जात असून यामुळे साथीच्या आजारांवर काही प्रमाणात मात करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती, जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल यांनी दिली. 

शहरात सिध्देश्‍वर यात्री निवास, कन्या महाविद्यालय, पालिका शाळा क्रमांक आठ व चार, झेले हायस्कूल आणि ल. पा. हायस्कूल येथे पूरग्रस्तांसाठी छावण्या सुरू केल्या आहेत. शहरातील अनेक सेवाभावी संस्था पूरग्रस्तांसाठी पुढे आल्या आहेत. पूरग्रस्तांच्या भोजनासह जनावरांच्या चाऱ्यासाठी अनेक हात पुढे सरवावले आहेत. शहरातील पाचही छावण्यांमध्ये सुमारे सातशे बालकांचा समावेश आहे. 

शहरातील सहा पूरग्रस्त छावण्यांमध्ये असणाऱ्या बालकांमध्ये साथीचे आजार आहेत. मात्र, ते नियंत्रणात आहेत. छावण्यांमध्ये बालकांवर उपचार सुरू असून अत्यावश्‍यक बालकांवर आशीर्वाद बालरुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरासह उदगाव, शिरोळ व अन्य गावांमध्ये उपचारातून साथ आटोक्‍यात आणू. 

- डॉ. सौ. सविता पाटील, 
बालरोगतज्ज्ञ, जयसिंगपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com