#KolhapurFlood शिरोळ तालुका वगळता अन्य ठिकाणचे पुरग्रस्त सुरक्षितस्थळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - जिल्ह्यात शिरोळ तालुका सोडून इतर सर्व ठिकाणच्या पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी नेण्याचे काम पूर्ण होत आले आहे. तथापि मोठ्या प्रमाणावर नागरिक अडकले असल्याचा जुन्याच पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत,  असे निदर्शनास येत आहे, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.  तालुक्यातील तब्बल 43 गावांना पुराचा फटका बसला असून त्यातील 28 गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. तालुक्यातील तब्बल 70 हजार नागरिकांना आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही सात ते आठ हजार नागरिक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. एनडीआरएफचे एकूण सहा तुकडे येथे कार्यरत असून यांत्रिक बोटी अभावी या ठिकाणी काही ठिकाणी मदत पोहोचणे आणि लोकांना बाहेर करणे अडचणीचे होऊन बसले आहे. नृसिंहवाडीमध्ये 70 पुजारी अद्यापही गावातच असल्याची माहिती आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood need of rescue operation in Shirol taluka