संभाव्य पुरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 347 कुटुंबांचे स्थलांतर

संभाव्य पुरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 347 कुटुंबांचे स्थलांतर

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी 39 फुटावर गेली. ही पुराचा इशारा देणारी पातळी असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून शिरोळमधील चार गावातील ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील २५० कुटुंबातील ३९० जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. 

पाण्याची पातळी वाढत असल्याने शिरोळ तालुक्यातील गोठणपूर ( कुरुंदवाड ) मधील चार, राजापूरमधील ४८, राजापूरवाडीमधील १८ व खिद्रापूरमधील २७ अशा ४ गावातून ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. त्याचबरोबरच ११६ जनावरांचेही स्थलांतर केले आहे. 

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील २५० कुटुंबातील ३९० व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. त्याचबरोबर गावातील ४५० जनावरांचेही स्थलांतर केले आहे.

दरम्यान, राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यामधून 7112, कोयनेतून 69739 तर  अलमट्टीतून 230000 विसर्ग क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुरस्थितीमुळे जिल्ह्यातील 71 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com