#KolhapurFlood शाळांना गुरुवारी, शुक्रवारी सुट्टी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर -  जिल्ह्यातील पुरस्थिती अद्याप कायम आहे. पावसाचा जोरही कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय व अंगणवाडी यांना गुरूवारी (ता. 8)  व शुक्रवारी (ता. 9) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांनी दिली आहे.

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या पूर्व सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. छत्रपती राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 55 फुट 6 इंच इतकी झाली असून ती वाढत आहे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood situation school closed on Thursday and Friday