#KolhapurFlood यांना हवी मदत तर, हे करत आहेत मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - सोशल मिडियावर सध्या अनेकजण मदतीसाठी याचना करत आहेत. तर काहींही मदतीसाठी हात पुढे केले आहेत. याबाबतचे मेसेज सध्या फिरत आहेत. 

कोणते मेसेज फिरत आहेत त्याची ही माहिती - 

चिखलीत यांना हवी मदत

कोल्हापूर - सोशल मिडियावर सध्या अनेकजण मदतीसाठी याचना करत आहेत. तर काहींही मदतीसाठी हात पुढे केले आहेत. याबाबतचे मेसेज सध्या फिरत आहेत. 

कोणते मेसेज फिरत आहेत त्याची ही माहिती - 

चिखलीत यांना हवी मदत

  • चिखलीत अण्णा ग्रूप इथल्या एका घराच्या टेरेसवर राणा पाटील यांच्यासह २ रुग्ण आणि २५ व्यक्ती अडकून पडल्या आहेत. त्यांच्या पर्यंत अद्याप एकही बोट पोहचलेली नाही. 9623115253 या क्रमांकावर संपर्क करुन मदत व्हावी.
  •  प्रयाग चिखली शाहू कमान जवळच्या गल्लीत सुशांत सुतार यांचे कुटुंब अडकले आहे. तसेच आणखी दोन कुटुंबे ही आहेत.

तादळवाडीकरांनाही हवी मदत

गगनबावडा मार्गे लोंघे गावा शेजारी नदीच्या पलीकडे तांदळवाडी गाव आहे. गावाला चारी बाजूंनी पुराने वेढा घातलेला तिथे 500 घर आहेत आणि जनसंपर्क तुटलेला आहे. तरी इमर्जन्सी मदतीची गरज आहे आणि तिथे बोट सुविधा पण नाही तरी हा मेसेज कोणी तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अथवा इमर्जन्सी मदत करणारी संस्थे कडे पोहोचवावी

संपर्क विनायक आळवेकर 9158009784

शाहुपुरीतील यांना हवी मदत
मी गजानन विश्वास कुरणे , जिल्हाधिकारी कार्यालयातील क्लार्क,  शाहूपुरी सहावी गल्ली कोल्हापूर  येथे पुराच्या पाण्यामध्ये अडकले आहे. सोबत परिवारातील 10 जण आहेत  लहान मुले तसेच  पेशंट आहेत मदतीची गरज आहे मोठी नाव व शिडी ची गरज आहे तरी तात्काळ मदत करा. मदत हवी आहे.

हाॅटेल सातबाराचा मदतीचा हात

कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या साठी एक हात मदतीचा देण्याचे '' हाॅटेल ७/१२ ने '' ठरवले आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे बरेच कुटुंबांना त्याची मोठी झळ बसली आहे अशा कुटुंबासाठी आपला एक हात मदतीचा आधार आधार पुरग्रस्तांना  आल्पोपहाराचा.... देऊन कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना आपणं  जेवणाची सोय केलेली  आहे जे पावसामुळे पुरामुळे अडकलेले आहेत किंवा  शासनाने  स्थलांतरित केलेली आहेत आशा  लोकांना जेवणाची सोय केलेली आहे.
 
संपर्क: हॉटेल ७/१२ उंचगाव, कोल्हापूर.
श्री.राहुल सावंत ( RD), फोन नंबर: 8308712712,                7391933939,  9011758470

इचलकरंजीत यांनी केली निवाऱ्याची सोय

इचलकरंजी शहर मर्यादित.  200 ते 300 लोकांना पुरेल इतके जेवण तयार आहे. तसेच निवाऱ्याची ही सोय करण्यात येईल. ज्यांना गरज असेल त्यांनी प्लीज या नंबरवर संपर्क करा.
1) 9834584247 अबोली मुल्ला. ए.जे. फाऊंडेशन.
2) 9960317173 जुबेर मुल्ला. ए. जे. फाउंडेशन.
24 तास संपर्कात राहू

300-400 लोकांना पुरेल इतके जेवण तयार आहे.
कृपया 841184 4488 या नं ला कॉल करा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood they wants help and they give help