#KolhapurFlood बागल चाैक कब्रस्थान, कसबा बावडा स्मशानभूमीत पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - बागल चौकातील कब्रस्थान, तसेच कसबा बावडा येथील स्मशानभूमीत पाणी आल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह अन्य ठिकाणी नेण्याची वेळ आहे. पाचगाव, उचगाव, लाईन बाजार याठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोल्हापूर शहर पाण्यात गेले आहे. शहराबाहेरील आणि अंतर्गत रस्ते पुराने वेढले आहेत. याचा फटका कब्रस्थान बसला आहे. मुस्लिम समाजाचे कब्रस्थान शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बागल चौकात आहे. सध्या बागल चौकातील कब्रस्थानमध्ये तीन फुट पाणी आले आहे. परिणामी गेल्या दोन दिवसात एकही मृतदेह या कब्रस्तानमध्ये जाऊ शकला नाही. परिणामी कोल्हापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचगाव डोंगरावर, दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उचगावमध्ये,आणि शहराच्या एका बाजूला असलेल्या लाईन बाजारच्या कबरस्थानाचा वापर करावा लागत आहे.

दरम्यान कसबा बावडा येथील स्मशानभूमीत सुद्धा पुराचे पाणी आल्यामुळे गेल्या दोन दिवसात एक ही मृतदेह तेथे पोहोचू शकला नाही. परिणामी कसबा बावडा आणि परिसरातील मृतदेह पंचगंगा नदी परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमीत घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flood water enters in crematorium in Bawada and Bagal Chowk