महापुरामुळे कोल्हापूरच्या 'या' मंडळांचा केवळ मूर्ती प्रतिष्ठापनेचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - महापुराच्या पार्श्‍वभूमीवर परंपरेप्रमाणे केवळ गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून उर्वरित अनावश्‍यक खर्चाला फाटा देण्याचा निर्णय विविध तालीम संस्था व तरूण मंडळांनी घेतला आहे. देखाव्यांसह भव्य मिरवणूका, विद्युत रोषणाई, मंडप आणि सजावटीवरील खर्च टाळून पूरग्रस्तांना निधी दिला जाणार आहे. दरम्यान, अनेक मंडळांनी मोठ्या मूर्ती न आणता छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचाही निर्णय घेतला आहे.

मंडळाचा परिसरच यंदा पुरात होता. त्यामुळे केवळ लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. प्रत्येक वर्षी प्रमाणे साकारला जाणारा देखावा रद्द केला असून जी काही वर्गणी जमा होईल, त्यातून परिसरातील पडझड झालेल्या घरांसाठी निधी दिला जाणार आहे. 
- प्रसाद जानवेकर,
त्रिमुर्ती गणेश मंडळ

मंडळातर्फे केवळ गणेशमूर्ती प्रतिष्ठापना होईल. पण, आगमन मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हा खर्च पूर्णपणे वाचवला जाणार आहे. उत्सवातील पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिला जाणार आहे.
- दत्तात्रय पाटील, 

बागल चौक मंडळ

मंडळातर्फे यंदा दहीहंडीचा उत्सवही रद्द केला आहे. त्याशिवाय गणेशोत्सवात केवळ मूर्ती प्रतिष्ठापना केली जाईल. कोणत्याही प्रकारचा देखावा नसेल. अगदी साधेपणाने उत्सव साजरा करून अधिकाधिक रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिली जाईल.
- विनोद सावर्डेकर, 

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ 

यंदा केवळ मूर्ती प्रतिष्ठापना करणार आहोत. देखावा व इतर सर्व गोष्टी रद्द केल्या असून पूरग्रस्तांना मंडळाने मदत केली आहे. मंडळ कुणाकडेही वर्गणी मागणार नाही. त्याशिवाय उत्सवातून जी काही रक्कम शिल्लक राहील, ती पूरग्रस्तांना देणार आहे.
- शशिकांत बिडकर, 

िव्हनस कॉर्नर मित्र मंडळ

मंडळातर्फे यंदा महापुरात मदतकार्य केलेल्या जवानांच्या कार्याला सलाम केला जाणार आहे. जवानाच्या रूपातील लहान फायबरची मूर्ती असेल आणि कमीत कमी खर्चात देखावा असेल. महापूर काळात मंडळाने पूरग्रस्तांना मदत केली. त्याशिवाय स्वच्छता मोहीमही राबवली. 
- अमोल साळोखे,

 जय शिवराय मंडळ, उद्यमनगर
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Ganesh Festival 2019 only Puja due to Flood