'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांमध्ये उभी फूट...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

सत्ताधारी गटामध्ये तीन गट...शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर यांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटले....

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून सोमवारी तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात दंड थोपटले. 

गोकुळ संघाचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील (आबाजी) , अरुणकुमार डोंगळे आणि संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी एकत्र येऊन स्वतंत्ररीत्या सहाय्यक दुग्ध उपनिबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे ठराव दाखल केल्यामुळे सत्ताधारी गटाला जबर धक्का बसला आहे.

हेही वाचा- शरद पवार यांनी ऐकली गाऱ्हाणी
 

संघाच्या हितासाठी एकत्रित 
 आज सकाळी नऊ वाजता तिघांनी मिऴून कार्यकर्त्यांसमवेत ४९७ ठराव दिले, यामध्ये विश्वास पाटील यांनी 293 तर अरुण डोंगळे यांनी 204 ठराव दाखल केले. उद्या पर्यंत आणखी शंभर ठराव देणार असल्याचे विश्वास पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना डोंगळे, पाटील यांनी संघाच्या हितासाठी आम्ही एकत्रित झालो असून आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत असल्याचे सांगितले.

हेही वाचा- समरजित यांचे शेट्टींसोबत स्नेहभोजन 
 

यावेळी, जि. प. सदस्य सुहास सातपुते, तुकाराम पाटील, धीरज डोंगळे, सुनील पाटील माजी पंचायत समिती सदस्य, सचिन पाटील, राहुल पाटील, अनिल सोलापूर आदी उपस्थित होते.

       
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Gokul Milk Union Elections Kolhapur Marathi News