शासकीय मालमत्तेची १३४१ कोटींची हानी

Marathi-School
Marathi-School

अतिवृष्टी, महापुराचा फटका; रस्ते, पुलांना अधिक दणका; महापालिकेचे सर्वाधिक नुकसान
कोल्हापूर - जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण, विभागीय सहकारी निबंधक कार्यालयाची मोठी हानी झाली. या सर्व विभागांतर्गत येणाऱ्या कार्यालयांसह इतर असे एकूण एक हजार ३४१ कोटी रुपयांचे शासकीय नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेंतर्गत असणाऱ्या प्रशासकीय इमारत, खोल्या तसेच स्टोअर रूमचे १६५ कोटी ७१ लाखांचे नुकसान झाले आहे. 

पाणीपुरवठा विभागाचे चार कोटी ६७ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय, ग्रामपंचायत इमारतीचे सुमारे १३ कोटी पाण्यात गेले आहेत. 

आरोग्य विभाग, प्राथमिक शाळांच्या इमारतींना तब्बल ३२ कोटींचा फटका बसला आहे. महापालिकेच्या रस्ते, गटार, मैदान, आरोग्य केंद्र, सांस्कृतिक सभागृह, शाळा, बागा, संरक्षक भिंत, ट्राफिक सिग्नल, जनरेटर व रस्त्यावरील दिव्यांचे ३४० कोटी ८२ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय, महापालिकेचा शहर पाणीपुरवठा विभाग, जॅकवेल, पंपिंग हाउसला चार कोटी ५० लाखांना फटका बसला आहे. जिल्ह्यात पडझड झालेल्या आणि अंशत: पडलेल्या घरांचे ४३ कोटींहून अधिकचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागाच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांनाही सुमारे २१ कोटी ९१ लाखांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा, पथदीप, जॅकवेल, रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहाचे २३ कोटी ३६ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यात आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com