जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात दुसरा खेटा

जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात दुसरा खेटा

जोतिबा डोंगर -  जोतिबाच्या नावानं चांगभलं यमाई देवी, चोपडाई देवी, नंदी, महादेव, बद्रिकेदार, काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दुसरा खेटा आज हाऊसफूल झाला. दुसऱ्या खेट्यासाठी महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे दीड लाख भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले.

या उच्चांकी गर्दीमुळे आज जोतिबा डोंगरास मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाणे संपूर्ण ज्योतिबाचा डोंगर दणाणून गेला. आज पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविक  डोंगरावर येण्यास सुरुवात झाली. बोचऱ्या थंडीत, रांगेतून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी अकरापर्यंत डोंगरावर मोठी गर्दी होती.

पहिल्या खेटयास लाखापेक्षा अधिक भाविक आल्याने इतर खेटयास उच्चांकी गर्दी होईल असे ग्रामस्थांनी सांगितले. आज कोल्हापुरातील असंख्य भाविक पंचगंगा नदी काठापासून पायी चालत डोंगरावर आले तर काही भाविक कुशिरे (ता पन्हाळा ) या गावी दुचाकी चारचाकी ,वाहने लावून गायमुख तलाव मार्गे डोंगराव आले तर काही भाविक पोहाळे, गिरोली ,दाणेवाडी या डोंगरातील पायवाटेने आले. 

यावेळी जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजराने हा परिसर दणाणून गेला. सकाळी जोतिबासह सर्व देवतांना अभिषेक व इतर धार्मिक विधी झाले, अभिषेकावेळी केदार उपाध्ये, शरद बुरांडे, बंडा उमराणी, सुरज उपाध्ये, प्रकाश उपाध्ये यांनी श्री केदार कवच स्तोत्र, केदार महिमा या विधींचे पठण केले.

सकाळी नऊनंतर श्री ची सालंकृत महापूजा बांधण्यात आली. दुपारी धुपारती सोहळा झाला. आज खेट्यांच्या पार्श्वभूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. 

जोतिबाची चैत्र यात्रा 19 एप्रिल रोजी
यंदा जोतिबाची चैत्र यात्रा 19 एप्रिल रोजी होत असून ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेने आतापासूनच बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. सासनकाठी चालक, सेवाभावी संस्था, अन्नछत्र चालक, ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी यांच्या ही बैठका होणार आहेत .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com