

KMT Public transport crisis
sakal
कोल्हापूर: आसन क्षमता ३४, त्याशिवाय उभे राहून प्रवास करायचा म्हटले तर तशी जागाही कमी, पण एक बस गेल्यानंतर दुसरी येण्यास किमान २० मिनिटांपर्यंतचा अवधी लागतो. त्यामुळे पुढील सारे नियोजन विस्कटून जात असल्याने समोर असलेल्या बसमधून कसाबसा प्रवास करायचा, या प्रवाशांच्या मानसिकतेमुळे आसन क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशांना घेऊन सध्या अनेक मार्गांवरील केएमटी बस धावत आहेत.