कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे भवितव्य अंधारात

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरवणारी कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याने या सेवेचे भवितव्य अंधारात आहे. सध्या २४ जानेवारीपासून ही सेवा ठप्पच आहे.
To Jet Airways
To Jet AirwaysSakal

उजळाईवाडी - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा (Kolhapur Mumbai Plane Service) पुरवणारी कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याने या सेवेचे भवितव्य अंधारात आहे. सध्या २४ जानेवारीपासून ही सेवा ठप्पच (Stop) आहे. मुंबईसाठी विमानसेवा पुरवणारी ट्रुजेट कंपनी (Tojet Company) आर्थिक अडचणीत (Economic Crisis) सापडली आहे. कंपनीकडे उपलब्ध सात विमानांपैकी पाच विमाने भाडेकरूंनी परत घेतली असून अन्य दोन विमानेही परत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे.

दरम्‍यान, ट्रुजेट कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीकडे कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सुरुवातीपासूनच या विमानसेवेसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असूनही कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे कोल्हापूर मुंबई विमानसेवा बंद आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून नाईलाजास्तव मुंबईसाठी अन्य पर्यायांचा शोध घेण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

To Jet Airways
पंचगंगेची खोली, रुंदी वाढवू ; आदित्य ठाकरे

आठवड्यातील जेमतेम तीन दिवस सुरू असणारी ही विमानसेवा अनियमिततेमुळे वर्षभर चर्चेत आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरून गेले काही दिवस बुकिंग सुरू होते, मात्र ऐनवेळी विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत होते.

दरम्यान, बुकिंगची सर्व रक्कम कंपनीकडून प्रवाशांना परत करण्यात येत आहे. संकेतस्थळावर मार्च महिन्यातील बुकिंग सुरू असून चालू महिन्यातील बुकिंग मात्र बंद असल्याचे संकेतस्थळावर दिसून येते. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विमानसेवा नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही.

कंपनी सध्या आर्थिक अडचणीत असून नवीन वित्त पुरवठादार मिळाल्यानंतरच नेहमीप्रमाणे विमानसेवा सुरू होणार असून यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

- रणजितकुमार कटारिया, ट्रुजेट अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com