कोल्हापूरः पर्यायी शिवाजी पुलाचा शेवटचा स्लॅब; ग्रामस्थांकडून वाजतगाजत गारवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

कोल्हापूर - बहुचर्चित कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या पुलाच्या शेवटच्या स्लॅबचे बांधकाम सुरु झाले. या निमित्ताने कोल्हापूर पंचक्रोशीतील महिलांनी गारवा आणून शोभा वाढवली.

कोल्हापूर - बहुचर्चित कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या पुलाच्या शेवटच्या स्लॅबचे बांधकाम सुरु झाले. या निमित्ताने कोल्हापूर पंचक्रोशीतील महिलांनी गारवा आणून शोभा वाढवली.

पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सकाळी नऊ वाजता सुरू झाले. या निमित्ताने ग्रामस्थांनी वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली. गेली पाच सहा वर्षे काही तांत्रिक कारणामुळे या पुलाचे काम बंद होते. आज अखेरच्या टप्प्यातील काम असल्यामुळे वडणगे, आंबेवाडी, बालिंगा या परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने येथे अंबील घुगऱ्या यांचा नैवेद्य आणला. आजपर्यंत या पुलासाठी आंदोलनात सक्रिय असलेले माजी महापौर आर. के. पोवार यांच्यासह कार्यकर्ते, पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य येथे गारव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महापौर सविता मोरे, बाबा पार्टे, स्वप्नील पार्टे, अशोक भंडारे, वैशाली महाडिक, चिखलीच्या ग्रामपंचायत सदस्य जयश्री दळवी, नंदा बोराटे, किशोर घाडगे, दीपाताई पाटील, माई वाडेकर, अशोक पवार, रमेश मोरे, महादेव पाटील, लाला गायकवाड, भीमराव आडके, नंदकुमार मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, वडणगेचे सरपंच सचिन चौगुले, चिखलीच्या सरपंच उमा पाटील, उपसरपंच भुषण पाटील आंबेवाडीचे सरपंच सिकंदर मुजावर, फिरोज खान उस्ताद यांनी सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur New Shivaji Bridge construction in last stage