जोतिबा परिसर विकासासाठी २५ कोटी - पालकमंत्री पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - श्री जोतिबा देवस्थान परिसर विकासासाठी शासनाने २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील ५ कोटी तातडीने दिले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर - श्री जोतिबा देवस्थान परिसर विकासासाठी शासनाने २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील ५ कोटी तातडीने दिले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे तयार केलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई या ॲपचा प्रारंभ आणि शारदोत्सवात सेवा दिलेल्या नागरिक आणि संस्थांचा सत्कार समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.

नवरात्रोत्सवात पोलिस, महापालिका, शाळेतील विद्यार्थी, विविध सेवासंस्था अनेकांनी सेवा दिली. त्यामुळे नवरात्रोत्सवात भाविक समाधानाने परत गेले. अशा सेवेसाठी योगदान केलेल्यांचा सन्मान करणे हे तर करवीरवासीयांचे कर्तव्य आहे. देवस्थान समिती ते पार पाडत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच सुवर्णपालखीमुळे अंबाबाईचे नाव जगभरात पोचले आहे. त्यामुळे खासदार महाडिकांचा सत्कारही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक यांनी देवस्थान समितीच्या उपक्रमाचे स्वागत केले आणि या सत्कारामूळे आणखी जबाबदारी वाढते, असे सांगितले. कार्यक्रमास देवस्थानचे सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सीचव विजय पोवार तसेच पोलिस, मनपा कर्मचारी, आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राबणाऱ्यांचा सत्कार
मंदिर सफाई करणाऱ्या संजय मेन्टेनन्सपासून लायटिंग, मंदिरातील गर्दीवेळी अगदी पाणीपुरवठा करणारी मुले, मंडप घालणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत आणि पालखीसाठी सेवा देणारे पोलिस बॅंडसह सर्वांचा सन्मान समितीने केला.

Web Title: Kolhapur News 25 cores for Jyotiba devasthan development