एम.फिल, पीएच.डी. प्रवेशासाठी ५० गुणांची अट

संदीप खांडेकर
मंगळवार, 13 जून 2017

परीक्षार्थींची कसोटी - रिसर्च मेथडॉलॉजीवर २५ प्रश्‍न
कोल्हापूर - यंदापासून शिवाजी विद्यापीठात एम.फिल, पीएच.डी.ला प्रवेशासाठी १०० पैकी ५० गुण मिळाल्यानंतरच परीक्षार्थी पात्र ठरणार आहे. परीक्षेत प्रत्येक प्रश्‍नाला दोन गुण दिले जाणार असून ‘रिसर्च मेथडॉलॉजी’वर २५ व उर्वरित २५ प्रश्‍न संबंधित विषयावर विचारले जाणार आहेत. विशेष म्हणजे पीएच.डी.साठी पदार्थविज्ञान विभागात सर्वाधिक ५१, एम.फिल.साठी पदार्थविज्ञान, मराठी व इंग्रजी विषयासाठी सर्वाधिक प्रत्येकी २० जागा उपलब्ध आहेत. पीएच.डी.साठी एकूण ६९६, तर एम. फिल.साठी २११ जागा परीक्षार्थींसाठी उपलब्ध आहेत. 

एम.फिल, पीएच.डी.साठी एम.ए.ची टक्केवारी, मुलाखतीस दिलेले गुण व प्रवेश परीक्षेतील गुण एकत्रित करून मेरीट लिस्ट जाहीर केली जात होती. यंदा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमानुसार प्रवेश 
परीक्षा होत असल्याने प्रवेश परीक्षेचे स्वरूप बदलले असून, परीक्षार्थींना रिसर्च मेथडॉलॉजी विषयाचा कसून अभ्यास करावा लागणार आहे. रिसर्चचा आवाका लक्षात यावा, रिसर्च म्हणजे काय व त्याची गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने हा विषय प्रवेश परीक्षेत समाविष्ट केला आहे. परीक्षार्थींना या विषयासह संबंधित विषयावरही लक्ष केंद्रीत करावे लागेल.प्रवेश परीक्षा झाल्यानंतर मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येईल. त्यानंतर परीक्षार्थीची मुलाखत घेऊन विषय निश्‍चिती केली जाणार आहे. मुलाखतीत परीक्षार्थीला शोधप्रबंधासाठीच्या विषयाचे सादरीकरण करावे लागणार आहे. स्वरूप बदलले आहे. 

विद्यापीठाने प्रवेश परीक्षेपूर्वी कॅटगरीनुसार कोणत्या विषयासाठी किती जागा उपलब्ध आहेत, याची माहिती दिली आहे. यापूर्वी सर्व अधिविभागांना कॅटगरीनुसारची यादी करावी लागत होती. परीक्षार्थी विभागात जाऊन ती माहिती घेत होते. विद्यापीठाने ही माहिती वेबसाईटवरच उपब्ध केली आहे. मास कम्युनिकेशन व वृत्तपत्र विद्या विभागात एकही जागा रिक्त नसल्याने या विभागाकरीता यंदा प्रवेश परीक्षा होणार नसल्याचे सांगण्यात आले. 

आवश्‍यक कागदपत्रे
पॅन कार्ड

आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायन्स
महाविद्यालयीन/विद्यापीठाचे ओळखपत्र

Web Title: kolhapur news 50 marks for m.phil, p.hd admission