व्यावसायिक वादातून इचलकरंजीत तरुणावर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

इचलकरंजी - येथील शांतिनगरातील नगरपालिकेच्या स्लॉटर हाऊससमोर (कत्तलखाना) बीफ मटणाच्या व्यावसायिक वादातून तरुणावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर संतप्त जमावाने संशयिताचा बंगला व बीफ मटणाच्या दुकानावर दगडफेक करून मोडतोड केली. यामुळे बेपारी गल्लीत तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 

इरफान रज्जाक बेपारी (रा. बेपारी गल्ली) असे चाकू हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुलकादर आझम बेपारी ऊर्फ कुरेशी (बेपारी गल्ली) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

हल्ल्यानंतर जमावाने संशयित अब्दुलकादर आझम बेपारी ऊर्फ कुरेशी यांच्या बंगला व बीफ मटणाच्या दुकानाकडे चाल केली. बंगला व दुकानावर दगडफेक करीत संसारोपयोगी साहित्यासह दरवाजे, खिडक्‍यांची मोडतोड केली. त्यामुळे बंगल्यात दगडे आणि काचांचा मोठा खच पडला होता. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

जखमी इरफान बेपारी व संशयित अब्दुलकादर बेपारी यांचा बीफ मटणाचा व्यवसाय आहे. त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून व्यवसायातून वाद निर्माण झाला आहे. आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास इरफान कत्तलखान्यासमोरच्या रस्त्यावर मोबाईलवर बोलत असताना अब्दुलकादर बेपारीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे गंभीर ७ ते ८ वार झाले असून, ते पाठ, पोट, हात आणि बरगड्या आदी ठिकाणी झाले आहेत. या हल्ल्यावेळी इरफानने केलेल्या आरडाओरडीमुळे स्लॉटर (कत्तलखाना) मधील त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी इरफानला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

संतप्त जमावाने आरोपी अब्दुलकादर बेपारी याचा बंगला आणि दुकानाची मोडतोड केल्याप्रकरणी त्याची पत्नी जलीस बेपारी ऊर्फ कुरेशी हिने इर्शाद बेपारी, हनिफ बेपारी, इक्‍बाल बेपारी, वहाब बेपारी, मोगली बेपारी, सोहेल बेपारी, सलमान बेपारी यांच्या विरोधात येथील शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: kolhapur news