शाहुवाडी तालुक्यात अपघातामध्ये दोघे जण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

आंबा -  ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर मोटरसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. निळे (ता. शाहूवाडी) येथील वळणावर सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.

आंबा -  ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर मोटरसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. निळे (ता. शाहूवाडी) येथील वळणावर सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.

शहाजी बापू गुजर (वय ४०, रा. माजगाव पैकी माळवाडी, ता. पन्हाळा) व सुदाम शंकर गोसाळ (४०, रा. मेढे गोसाळवाडी, 
ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत. दोघे रत्नागिरीहून मोटारसायकलवरून (एमएच ०९ ईडी ८६१७) कोल्हापूरकडे येत होते. 

निळे येथील वळणावर मोटारसायकल समोरून येणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या (केए ४८ टी २८४५) ट्रॉलीवर जाऊन आदळली. धडक एवढी जोराची होती, की दोघे जागीच ठार झाले. मृतदेहांचे विच्छेदन मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अनिल गाडे, फौजदार श्री. यम्मेवार यांनी भेट दिली.

Web Title: Kolhapur News accident in Shahuwadi Taluka two dead