तब्बल ११ महिन्यानंतर झाला आयजीएम रुग्णालय पगार 

पंडित कोंडेकर
बुधवार, 21 मार्च 2018

इचलकरंजी - येथील राज्य शासनाकडे हस्तांंतरीत झालेल्या आयजीएम रुग्णालयाकडील ५३ कर्मचाऱ्यांचा पगार तब्बल अकरा महिन्यानंतर झाला. तर अद्याप १४ कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. येत्या आठवडाभरात त्यांच्या हातात पगार मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या मालकीचे आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत झाले. मात्र तांत्रिक कारणामुळे कर्मचारी वर्गाचा पगार प्रलंबीत राहिला होता. एप्रिल २०१७ पासून पगार रखडला होता. पगार होण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनाच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यानंतर पगारासाठी सव्वा तीन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. कांही दिवसांपूर्वी वेतनीपोटी रक्कम वितरीत करण्याचा शासनाचा अध्यादेश निघाला होता. त्यानंतर पगार तातडीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

त्यानुसार शनिवारी पाच महिन्यांची व आज पाच महिन्यांचा असा अकरा पैकी दहा महिन्यांचा प्रलंबीत पगार आज कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. यामध्ये ५३ कर्मचारी यांचा पगार झाला आहे. तथापि, अद्याप १४ कर्माचारी यांचा मात्र पगार झालेला नाही. त्यांचे समावेशन उशिरा झाले आहे. त्यामुळे त्यांचा पगार येत्या आठवडाभरा नंतर  होईल, असे शासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Kolhapur News After 11 months IGM Hospital Salary