वरिष्ठ एजंटांना शिव्यांची लाखोली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

कोल्हापूर : ""तुमच्या विश्‍वासावर आम्ही लोकांकडून पर्ल्ससाठी पैसे वसुल केले. लोकं गावातून फिरू देत नाहीत. आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. तुमची नाटकं बंद करा, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही,'' असा दम देत पर्ल्स कंपनीसाठी काम करणाऱ्या एजंटांनी आपल्या वरिष्ट एजंट व अधिकाऱ्यांवर आज शिव्यांची लाखोली वाहिली. 

मेळाव्यानंतर एजंट व ग्राहक मुख्य व्यासपीठावर आले. त्यानंतर वरिष्ठ एजंटांना शाहू स्मारक भवनच्या मेकरूममध्ये मुकाटपणे एजंटांच्या शिव्या खाव्या लागल्या. समर्थ क्रांतीचे पदाधिकारी व्यासपीठावर बोलत असतानाच सुभाष हाफळे यांनी, "तुमची नाटकी बंद करा आणि लोकांचे पैसे कधी परत देणार हे सांगा' म्हणतच हल्लाबोल केला. त्यांना बाहेर जाण्यास सांगून मेळावा सुरू ठेवला. 

मेकअप रूममध्ये एल. बी. आंबी यांना "तुमच्या विश्‍वासावर पैसे कंपनीत भरले. तुमच्या जबाबदारीने ती रक्कम आम्हाला परत करा. तुम्ही तुमचं घरदार विका पण आमचे पैसे परत करा. तुम्ही साधा फोन घेत नाही. आता तुमचं चालू देणार नाही. लोक आम्हाला मारायला उठलेत. आमची आई लोकांचे बोलणे खात हदयविकाराने गेली. त्यामुळे तुम्हाला आता सोडणार नाही,' असा इशारा देत राहुल मडके, सचिन तामगावे, सागर गतारे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. 

एम. एम. जमादार, पी.डी.थोरबोले, टी. पी. पाटील, एच. ए. अत्तार, श्री. आंबी यांना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एजंटांचे ऐकून घ्यावे लागले. 

पै-पाहुण मयतालाही येईनात 
प्रत्येक पाहुण्याची पॉलीस सुरू केली. त्यांचे पैसे परत मिळत नसल्याने पाहुणे तर तुटलेच आता आमच्या घरात कोण मयत झाले तरी पै-पाहुणे येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. असे म्हणत एका एजंटाने पोटतिडकीने बाजू मांडली. 

Web Title: kolhapur news agent

टॅग्स