इंधन दरवाढी विरोधात मुरगुडमध्ये गांधीगीरी

प्रकाश तिराळे
गुरुवार, 31 मे 2018

मुरगुड - मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इंधन दर वाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मुरगुड बस स्थानक परिसरात  भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी वाहन धारकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने दरवाढीचा निषेध नोंदवला.

दलित मित्र डी. डी. चौगले म्हणाले, सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली गोरगरिबांची लुबाडणूक सुरु केली आहे. इंधन दर वाढल्यामुळे महागाई झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाने जगायचे कसे ?

मुरगुड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, नगरसेवक रविराज परीट, कागल तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष निलेश शिंदे, आबासो खराडे, संजय सुर्यवंशी, अमर सारंग, दत्ता हासबे, सुखदेव चौगले, बाजीराव मांगोरे, दिगंबर परीट, अमित तोरशे, महंतेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News agitation against Petrol rate hike in Murgud