जिल्‍हाधिकारी कार्यालयाला 1 जूनला घेराव घालणार - डॉ. अजित नवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

१ जूनला राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराओ घालून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारला जागे करू या,’’ असे आवाहन शेतकरी लाँगमार्च संयोजक, किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी येथे केले.  

कोल्हापूर - ‘‘राज्यात दुधाला अपेक्षित दर मिळत नाही, शेतमालाच्या हमीभावापासून ते आयात-निर्यातीवरील बंदीपर्यंतचे प्रश्‍न कायम आहेत. यातून सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्‍न गांभीर्याने न घेतल्याचे दिसते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी गट-तट बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र यावे. १ जूनला राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराओ घालून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारला जागे करू या,’’ असे आवाहन शेतकरी लाँगमार्च संयोजक, किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी येथे केले.  

अखिल भारतीय किसान सभेतर्फे मुख्याध्यापक संघाच्या हॉलमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
इमान जमिनीचे संघटक उमेश देशमुख म्हणाले, ‘‘राज्यातील इमाने खालसा झाली; मात्र तिसऱ्या क्रमांकाचे इमान खालसा झालेले नाही. कोणताही शासकीय प्रकल्प आणायचा झाला तर त्यासाठी इनाम जमिनी लक्ष्य केल्या जातात. अशा जमिनीवर जिथे शेतकऱ्यांचा अधिकार आहे त्या जमिनी शेतकऱ्यांना पूर्णः हक्काने मिळाल्या पाहिजेत.’’

डॉ. सुभाष जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य पी. बी. पाटील, आनंदा चव्हाण, शिवाजी मगदूम, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.

 

  • सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे एकत्र लढले पाहिजे 
  • आमदार, खासदार पदे डोळ्यांसमोर ठेवून लढू नका शेतकऱ्यांसाठी लढा

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
मागील वर्षी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सरकारने मध्यस्थी करायला लावली तेव्हा ‘फायर ब्रिगेड’ म्हणून दादांनी काम केले; मात्र त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नाही. असेही श्री. नवले यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News agitation in Collector office on 1 June