कर्जमाफीपासून कोणीही वंचित नाही - कृषी राज्यमंत्री खोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. कर्जमाफीत त्रुटी राहू नयेत, यासाठी काही वेळा परिपत्रक बदलावे लागले. पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, याची काळजी घेतल्याची माहिती पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिली.

दरम्यान, जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५८५ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले.

कोल्हापूर - जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. कर्जमाफीत त्रुटी राहू नयेत, यासाठी काही वेळा परिपत्रक बदलावे लागले. पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, याची काळजी घेतल्याची माहिती पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिली.

दरम्यान, जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५८५ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण व सत्कारप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी शेतकऱ्यांना कृषी राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व साडी-चोळी आणि पेहराव देऊन सन्मानित केले.

सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘शासनाने सरसकट दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कर्जमाफी खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे, अशी भूमिका होती. गेल्यावेळी झालेल्या कर्जमाफीत चुकीच्या लोकांनी कर्जमाफी घेतली. यामध्ये ज्याला कर्जमाफी व्हायला पाहिजे होती, ते शेतकरी वंचित राहिला होता.  कर्जमाफी जाहीर करताना किंवा देताना शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज व त्यांची छाननी, याद्या तयार करणे, योजनेच्या अंमलबजावणीची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हास्तरावर व उपविभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येत असून, नियमित कर्जदारांच्या खात्यावरही लवकरच प्रोत्साहन रक्कम जमा करणार आहे.’’

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ‘‘दिवाळी दिवशीच शेतकरी कर्जमाफी योजना प्रत्यक्ष अंमलात आणली. पात्र शेतकऱ्यांनाच कर्जाचा लाभ व्हावा यासाठी ३९१ ग्रामपंचायतींचे चावडीवाचन झाले आहे. उर्वरित चावडीवाचन २५ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’

कार्यक्रमाची सुरवात शेतकऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी आभार मानले. या वेळी विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) तुषार काकडे, पणनचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. बी. बोराडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

लाभार्थ्यांची नावे -
शामराव गेड्डी, रामचंद्र हसुरी (ता. गडहिंग्लज), इंदूबाई दणाणे, बाळासाहेब कासार (ता. हातकणंगले), संतान फर्नांडिस, धोंडिबा पाटील, मारुती राजगोळकर (ता. चंदगड), संजय सोनुले, सुधाकर जाधव (ता. कागल), धोंडिराम कांबळे, दिनकर तारळेकर (आजरा), विश्‍वनाथ गायकवाड, बंडा कुंभार (ता. राधानगरी), संभाजी सुतार, सदाशिव कांबळे (ता. गगनबावडा), हंबीरराव कांबळे, महेश गावडे (ता. करवीर), नंदकुमार दळवी, शामराव पाटील (ता. शाहूवाडी), विठ्ठल दाभोळे, तुकाराम कुरणे (ता. भुदरगड), सुभाष बेबाजे, संजय माने (ता. शिरोळ), आनंदा चौगले (ता. पन्हाळा).

Web Title: Kolhapur news Agriculture Minister Sadabhau Khot Speech