कोल्हापूरहून हैदराबाद, बंगळूरसह तिरुपतीसाठी विमानसेवेची अधिसूचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. तोवर केंद्र सरकारने उडान योजनेअंतर्गत कोल्हापूरहून हैदराबाद, बंगळूर अणि तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे ही अधिसूचना काढण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत या सेवा सुरू होतील. बंगळूर व हैदराबादसाठी एलायन्स एअरलाईन, तर तिरुपतीसाठी इंडिगो कंपनीने सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. 

देशातील छोट्या शहरांना मोठ्या शहरांसाठी जोडण्यासाठी केंद्र सरकाने उडान नावाची योजना सुरू केली आहे. कोल्हापूरसह राज्यातील अन्य काही शहरांचाही या योजनेत समावेश आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत या प्रयत्नांना यश आलेले नाही. कोल्हापूर ते मुंबईचे विमान सुरू करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले; पण त्यामध्ये अपयशच आले. त्यातच आता केंद्र सरकारने उडान योजनेबाबतची अधिसूचना काढली असून त्यामध्ये कोल्हापूरचाही समावेश केला आहे.

कोल्हापूर ते हैदराबाद, कोल्हापूर ते बंगळूर आणि कोल्हापूर ते तिरुपती अशी तीन ठिकाणी ही विमानसेवा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे. अशा प्रकारची सेवा सुरू झाली तर पर्यटनात मोठी वाढ होऊ शकते. कोल्हापूरहून तिरुपती आणि हैदराबाद, बंगळूरकडे जाणाऱ्या पर्यटकांचीही संख्या चांगली आहे. विमानसेवेमुळे त्याला गती येईल. त्याचबरोबर कोल्हापूर ते तिरुपती या विमानसेवेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची शक्‍यता आहे. 

केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली असून, याबाबत एलायन्स एअरलाईन आणि इंडिगो या दोन कंपन्या यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. ही विमानसेवा सुरू होण्याबाबतच्या प्रयत्नांना आणखी बळ दिले तर लवकरात लवकर ही विमानसेवा सुरू होते. केंद्राच्या पातळीवर यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच राजकीय इछाशक्तीचीही गरज असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Kolhapur News air service to Hydrabad, Benglore, Tirupati