‘भाजप’च्या चुकीच्या कारभारापासून महाराष्ट्राला सावर - अजित पवार यांचे अंबाबाईला साकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर - भाजप सरकारमुळे महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपच्या चुकीच्या, बेजबाबदार कारभारामुळे लोक रस्त्यावर येऊन या सरकारला विरोध करू लागले आहेत. या सर्व अस्वस्थेतून महाराष्ट्र सावरण्यासाठी मी आई अंबाबाईला साकडे घालणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे सांगितले.

कोल्हापूर - भाजप सरकारमुळे महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपच्या चुकीच्या, बेजबाबदार कारभारामुळे लोक रस्त्यावर येऊन या सरकारला विरोध करू लागले आहेत. या सर्व अस्वस्थेतून महाराष्ट्र सावरण्यासाठी मी आई अंबाबाईला साकडे घालणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी अंबाबाई रथोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

आमदार पवार म्हणाले, आज राज्यातील एकही घटक समाधानाने जगू शकत नाही, ऐवढा चुकीचा कारभार सध्या भाजप सरकारचा चालला आहे. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किंवा आमदार म्हणून बोलत नाही, हे वास्तव आहे. भाजपच्या चुकीच्या कारभाराबाबत सगळीकडे लोक बोलायला लागले आहेत. लोक रस्त्यावर यायला लागले आहेत. त्यांचे मंत्री व मुख्यमंत्री भाषण करतात, त्यावेळी लोक विरोध करायला लागले आहेत, असे चित्र महाराष्ट्रात कधीही पाहायला मिळाले नव्हते. रथोत्सवानिमित्त आपण आई अंबाबाईला साकडे घालतो की, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुन्हा सावरला जाईल. शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा याच पुरोगामी विचाराने महाराष्ट्र पुढे जावा, अशी प्रार्थना करत असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री सुनील तटकरे, आदिल फरास, संगीता खाडे उपस्थित होत्या. 

मला रथ वडायचा हुता रे... 
अंबाबाईचा रथ ओढण्याचे भाग्य मिळणार, या अपेक्षेने आलेल्या माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यकर्ते एम. एल. जी. हायस्कूलच्या मैदानावर घेऊन आले. तत्पूर्वीच रथोत्सवाला सुरुवात झाली होती. दरम्यान, रथोत्सव मिरवणूक सुरू झाल्याचे समजताच आमदार पवार यांनी कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. मला रथ वडायचा हुता आणि तुम्ही हित रं कुठ आणलसा लगेच. पवार यांची रथ ओढण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असतानाच पवार यांचे बोल ऐकून कार्यकर्तेही काहीकाळ निःशब्द झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी आणलेली खीर पाहुणचार संपवून तत्काळ ते गुजरीकडे रवाना झाले. तिथेच त्यांनी रथाचे दर्शन घेतले. 

Web Title: Kolhapur News Ajit Pawar Comments