कोल्हापूरच्या अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने 

संभाजी गंडमाळे
बुधवार, 31 जानेवारी 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात आज किरणोत्सवाचा सोहळा पूर्ण क्षमतेने झाला. आजच्या पहिल्या दिवशी मूर्तीच्या खांद्यापर्यंत मावळतीची किरणे पूर्ण क्षमतेने पोचून चेहऱ्यावर फार काळ न विसावता डावीकडे लुप्त झाली. किरणोत्सव मार्गातील अडथळे काढल्यानंतर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काल किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोचली होती. 

सलग तीन दिवस अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा होणार आहे. सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी किरणांची तिरीप महाद्वारातून गरुड मंडप येथे आली. त्यानंतर पाच वाजून 47 मिनिटांनी गरूड मंडपात पूर्ण क्षमतेने सरकली. सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत कासव चौक व पितळी उंबरा ओलांडून पुढे चार मिनिटांनी पहिल्या पायरीपर्यंत सहा वाजून 17 मिनिटांनी देवीच्या चरणांना स्पर्श करून किरणे पुढे मूर्तीच्या खांद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोचली. पुढच्या दोन मिनिटात ती देवीच्या मुखकमलावर पूर्ण क्षमतेने स्थिरावतील, अशी उत्सुकता ताणून राहिली असतानाच ती डावीकडे लुप्त झाली.

यावेळी अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकार, प्रा. किशोर हिरासदार, ऍड. केदार मुनीश्‍वर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, अभ्यास समितीचे उदय गायकवाड, नगररचना विभागाचे सहसंचालक धनंजय खोत, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, किरणोत्सव, चंद्रग्रहण आणि पौर्णिमेदिवशी होणारा देवीचा पालखी सोहळा असा दुर्मिळ योग आज जुळून आला. त्यामुळे आज सकाळपासून मंदिरात देवीसमोर विविध धार्मिक विधी झाले. देवीच्या नित्यपूजेत किरकोळ बदल करून मूर्तीवर संततधार अभिषेक झाला.

Web Title: Kolhapur News Ambabai Temple Kiranotsav