अंगणवाडी सेविकांचे कोल्हापूरात ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी शहरातल्या मुख्य स्टेशन रोडवर ठिय्या आंदोलन केलं. गेल्या 11 सप्टेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यातही अंगणावाडी सेविकांचा संप सुरु आहे. मागण्या मान्य होत नसल्यानं आजही या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.

कोल्हापूर -अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी शहरातल्या मुख्य स्टेशन रोडवर ठिय्या आंदोलन केले. गेल्या 11 सप्टेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यातही अंगणावाडी सेविकांचा संप सुरु आहे. मागण्या मान्य होत नसल्याने आजही या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

स्टेशन रोडवर हे आंदोलन केल्यामुळं या मार्गावरची वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. सरकारच्य़ा विरोधात घोषणा देत शेकडो महिलांनी यात सहभाग नोंदविला. आपल्याला किमान 10 हजार रुपये वेतन मिळावं अशी मागणी यावेळी अंगणवाडी सेविकांनी केली. तसंच 1500 रुपयांची केलेली वाढ ही मान्य नसल्याचेही आंदोलनकर्त्या महिलांनी म्हटले आहे. या आंदोलनामुळे शहरातल्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन करणाऱ्या या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 

Web Title: Kolhapur news anganwadi sevika protest