कोवाड येथे पंधरा एकरावरील ऊस आगीत खाक

अशोक पाटील
सोमवार, 8 जानेवारी 2018

कोवाड - येथे शॉर्टसर्टिकमुळे ताबांळ नावाच्या शेतातील 15 एकरातील ऊस जळून खाक झाला. आगीत 16 शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याने अंदाजे वीस लाखाचे नुकसान झाले आहे. आज दुपारी एक वाजता ही घटना घडली.

कोवाड - येथे शॉर्टसर्टिकमुळे ताबांळ नावाच्या शेतातील 15 एकरातील ऊस जळून खाक झाला. आगीत 16 शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याने अंदाजे वीस लाखाचे नुकसान झाले आहे. आज दुपारी एक वाजता ही घटना घडली.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे येथे दुसऱ्यांदा ऊस जळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उद्या सकाळी 11वाजता महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हेमरस साखर कारखान्याने तात्काळ सहा ऊस टोळ्या लावून ऊस तोड सुरु केली आहे. 

येथील गावापासून पाचशे मिटर अंतरावर तांबाळ नावाचे शेत आहे. येथे ऊसाचे उत्पादन चांगले येत असल्याने शेतकरी केवळ येथे ऊस पिकाचेच उत्पादन घेतात. पण संपूर्ण शेती क्षेत्रात विज कंपनीच्या वाहिन्या धोकादायक स्थितीत आहेत. वाकलेले पोल, लोंबकाळणाऱ्या वीज वाहिनी असे चित्र असल्याने दोन वर्षापूर्वी शॉटसर्टिकमुळेच येथील 10 एकरातील ऊस जळाला होता. अद्याप त्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना याची सुचना दिली होती. पण अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेतल्याने आज पुन्हा दुपारी एक वाजता शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली.

आगीत अनुसया वांद्रे, उत्तम मुळीक, सोमाना वांद्रे, रामा वांद्रे, गंगाराम पवार, विठ्ठल गिरी, जोतिबा आडाव, पुजा आडाव, तानाजी आडाव, बाळकृष्ण कांबळे, सत्तुराम बागिलगेकर, वैजू वांद्रे, नामदेव आडाव, विठ्ठल आडाव, आनंद आडाव व नारायण पवार या शेतकऱ्यांच्या ऊसाचा समावेश आहे. आग आटोक्‍यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. पण आगीचे लोट दुरवर पसरत असल्याने 15 एकरातील ऊस जळून खाक झाला. 

महावितरणला जाब विचारणारा वाली आहे का?.....
कोवाड परिसरात शॉर्टसर्किटमुळे गेल्या दोन वर्षात ऊस जळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण महावितरणच्या कारभारात अद्याप सुधारणा नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारा कोणी वाली आहे. असा प्रश्‍न याप्रसंगातून शेतकरी विचारत आहेत. 

 

Web Title: Kolhapur News Around 15 acres of sugarcane fire in Kovad