कुरुंदकरच्या बंगल्याची डायरीसाठी झडती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

कोल्हापूर - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या खुनातील संशयित आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या राजेंद्रनगरातील बंगल्याची झडती मुंबईतील पथकाने घेतली. खुद्द संशयितांना बरोबर घेऊन ही झडती घेण्यात आली. महत्त्वाचा पुरावा असलेली ‘डायरी’ मिळविण्यासाठी हा प्रयत्न झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

राजेंद्रनगरातील बंगल्यात आज खुद्द तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो पथकात होत्या. दिवसभरात कोल्हापुरातील तपासानंतर पथक बिंद्रेंच्या गावी तिच्या सासऱ्यांचा जबाब घेण्यासाठी रवाना झाल्या. दरम्यान, मुंबईतील गुन्हे अन्वेषणच्या दोन पथकांनी कोल्हापूर, आजरा आणि आळते (ता. हातकणंगले) येथे तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले.
महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिंद्रे यांचा खून करून मृतदेह खाडीत टाकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या तपासात अनेक धागेदोरे तपास अधिकारी शिंदे यांच्याकडे मिळाले आहेत. अभय कुरुंदकर याने लिहिलेली डायरी तपासाचे मुख्य अंग असल्याचे सांगण्यात येते. त्याचे महत्त्वाचे मुद्दे कोल्हापूर आणि आजऱ्यात असल्याने पथकाने थेट येथेच लक्ष्य केंद्रित केले आहे. संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज (ता. ११) संपत आहे. त्यामुळे दिवसभरात त्यांच्याकडून शक्‍य तेथे चौकशी करण्यात आली. अश्‍विनी बिंद्रेंचे पती राजू गोरे दिवसभर पथकाबरोबर होते. दुपारी राजेंद्रनगरातील बर्डस्‌ पब्लिक स्कूलजवळील कुरुंदकरच्या घरावर खासगी वाहनांतून पथक पोचले. त्यांनी बंगल्यातील झडती घेतली. तपासातील अधिक माहिती समजू शकली नाही. सायंकाळनंतर पथक बिंद्रेंच्या घरी रवाना झाले. तेथे ते सासऱ्यांचा जबाब नोंदविणार असल्याचे समजते.

मुख्यालयातील पोलिसाला माहिती
सध्या पोलिस मुख्यालयात नोकरी करीत असलेल्या एका पोलिसाकडे संशयाची सुई फिरत आहे. त्याच्याकडे अभय कुरुंदकरच्या मालमत्तेबाबत इत्यंभूत माहिती असल्याचे समजते. संबंधित पोलिसाकडेही चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Kolhapur News Ashwini Bidre Murder case