कोल्हापूर प्राधिकरण कार्यालय प्रशासकीय इमारतीत

सुनील पाटील
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाची स्थापना केली, मात्र याचे कार्यालय कोठे घ्यायचे? हा मोठा प्रश्‍न होता. तो प्रश्‍न आता निकालात निघाला आहे. प्राधिकरणाचे कार्यालय कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत घेतले आहे.

कोल्हापूर -  हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाची स्थापना केली, मात्र याचे कार्यालय कोठे घ्यायचे? हा मोठा प्रश्‍न होता. तो प्रश्‍न आता निकालात निघाला आहे. प्राधिकरणाचे कार्यालय कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत घेतले आहे.

या कार्यालयात कोणता अधिकारी काम पाहणार? त्याचा स्टाफ पॅटर्न कसा असणार, याबाबत नियोजन करून प्राधिकरणाला गती दिली जाणार आहे. 
कोल्हापूर व परिसरातील ४२ गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाची स्थापना केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. गोकुळ शिरगाव व शिरोली या दोन औद्योगिक वसाहतींना प्राधिकरणातून वगळले. प्राधिकरणाची घोषणा झाल्यानंतर त्याचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.

प्राधिकरणाच्या कामाचा व्याप मोठा असणार आहे. लोकांची वर्दळही वाढणार आहे. आधीच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यात प्राधिकरणाचे कार्यालय घेणे गैरसोयीचे ठरले असते. या पार्श्‍वभूमीवर प्राधिकरणाचे कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत घ्यावे का? यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी त्याची पाहणी केली. त्यानुसार प्रशासकीय इमारतीतच प्राधिकरणाचे कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्याची जागाही निश्‍चित केली.

आता या कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्त करायची किंवा त्याचा स्टाफ पॅटर्न कसा ठेवायचा,  याला गती दिली जाणार आहे. कोल्हापुरात प्राधिकरणासाठी चांगला, सक्षम आणि ज्याला कोल्हापुरातील या गावांची परिपूर्ण माहिती असणाऱ्या अधिकाऱ्याचीच नियुक्ती करावी लागणार आहे. ज्या प्राधिकरणाचा जो हेतू आहे, तो साध्य करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. पालकमंत्री चंद्रकांत यांचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचे कामकाज सुरू राहणार आहे. 

* प्राधिकरण स्थापन करताना  केलेले नियोजन असे : 
* गावच्या नियोजनबद्ध विकासासाठीच प्राधिकरण  
*सरकारी कामासाठी शेत जमिनीवर आरक्षण टाकणार नाही. 
* प्राधिकरणातही ग्रामपंचायतींचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार 
* जागांवर आरक्षण टाकण्याची भीती नको 
* शहराप्रमाणे सुविधा मिळणार 

Web Title: Kolhapur News Authorization office in Government building