कृष्णात पाटील, अभिजित मगदूम यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

कोल्हापूर - श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे कृष्णात पाटील, भीमा बिल्डर्सचे अभिजित मगदूम यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार जाहीर झाला.

कोल्हापूर - श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे कृष्णात पाटील, भीमा बिल्डर्सचे अभिजित मगदूम यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त म्हणजे मंगळवारी (ता. १) रेसिडेन्सी क्‍लब येथे सायंकाळी पाचला खासदार संभाजीराजे व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष राजीव लिंग्रस आणि असोसिएशनच्या गर्व्हनिंग कौन्सिलचे सदस्य प्रताप कोंडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्कार वितरणप्रसंगी असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास बिरारी, पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रताब साळुंखे उपस्थित राहणार आहेत.

श्री. लिंग्रस म्हणाले, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. याचवेळी जिल्ह्यातील नामवंत ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकांना मानपत्र अर्पण आणि उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान केला जाईल. कोल्हापूरचे नाव देशभर पोचविणारे दिवंगत उद्योजक राजाराम दत्तात्रय तथा आर. डी. पाटील-सडोलीकर त्यांचे दिवंगत बंधू एस. डी. पाटील-सडोलीकर यांना व अर्थमुव्हिंग व्यवसायातील दिग्गज उद्योजक डी. के. पाटील आणि जे. के. पाटील यांना कर्तृत्वशाली कार्याबद्दल मानपत्र प्रदान करून गौरविले जाणार आहे.

असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेला सात वर्षे पूर्ण होत आहेत.  उपाध्यक्ष संग्रामसिंह निंबाळकर, प्रशांत मुचंडी, प्रताप कांडेकर, सचिन पाटील, शिवा जाधव उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News award to Krushant Patil, Abhijeet Magdum