कोल्हापूरात एसटीचा सुमारे 40 लाखांचा महसूल बुडला 

शिवाजी यादव
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोल्हापूर - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या बंदचा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला फटका बसला. एसटी महामंडळाची वाहतूक बंद राहिल्याने शेकडो प्रवाशांची कोंडी झाली. यातून दिवसभरात सुमारे 40 लाख रूपयांचा महसुल बुडाला आहे.

कोल्हापूर - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या बंदचा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला फटका बसला. एसटी महामंडळाची वाहतूक बंद राहिल्याने शेकडो प्रवाशांची कोंडी झाली. यातून दिवसभरात सुमारे 40 लाख रूपयांचा महसुल बुडाला आहे. बहुेतक आंदोलनात होणाऱ्या दगडफेकीत गाड्या लक्ष्य होतात आजच्या आंदोलनात एसटीच्या दहा गाड्या विविध ठिकाणी फोडल्याने दोन लाखाचे नुकसान झाले. 

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्यामुळे महामंडळाने खबरदारी घेत दिवसभर सेवा बंद ठेवली; मात्र रात्री परगावी गेलेल्या गाड्या परत येत असताना आंदोलकांनी लक्ष्य केल्या. दगडफेकीत दहा गाड्यांचे नुकसान झाले. यात हातकणंगले येथे तीन, रेंदाळ येथे दोन, आजरा दोन गोकूळ हॉटेल येथे एक, सांगवडे व वसगडे येथे प्रत्येकी एक गाडी दगडफेकीत नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या वाहतुक विभागाने दिली. 

खबरदारीचा उपाय म्हणून मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा व रेल्वेस्थानक येथील बसस्थानकावरील वाहतुक बंद ठेवली. बहुतांशी गाड्या मध्यवर्ती बसस्थानकात थांबून होत्या. एसटी बस मुख्य बसस्थानकाकडे येणारे व जाणारे गेट पूर्णतः बंद केले होते तर बसस्थानकावर शेकडो प्रवासी थांबून होते. सायंकाळी बंद मागे घेतल्यानंतर बसगाड्या सुरू होतील अशी अपेक्षा होती; पण शहरातील कांही भागात तणावपूर्ण परस्थिती असल्याने बस सुरू केल्या नव्हत्या त्यामुळे प्रवाशांच्या प्रतिक्षेत वाढ झाली. 

अशात खासगी सेवाही बंद होती. सकाळपर्यंत बहुतांश गाड्या कोल्हापूरात आल्या पण मध्यवर्ती बसस्थानकातून परगावी सोडल्या गेल्या नाहीत. दहानंतर येणाऱ्या बहुतांशी खासगी बस तावडे हॉटेल येथेच थांबल्या. रंकाळा ते कळे, बाजारभोगाव, कोल्हापूर ते मलकापूर, बांबवडे, हुपरी, रेंदाळ, कागल मार्गावर होणारे सर्व वडाप बंद होते. या दोन्ही वाहतुकीत व्यवसायात जवळपास दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज खासगी वाहतुकदारांनी व्यक्त केला. 

माणुसकीचे दर्शन 
बसस्थानकावर शेकडो प्रवासी थांबून होते. चहा नाष्ट्याच्या गाड्या, हॉटेल्स बंद राहिल्याने ते दिवसभर भूकेने व्याकूळ झाले. अनेक प्रवाशी बसस्थानक आवारात मिळेल ते खाद्यपदार्थ घेत होते; पण तेथे काही काळासाठी बसस्थानकावरील स्टॉल्स बंद झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली. याच वेळी बाहेरगावाहून आलेल्या चालक-वाहकांना नाष्टा मिळणे मुश्‍कील झाले. मात्र स्थानिक चालक-वाहकांनी घरातून चहा नाष्टा, जेवण आणून देत सहकाऱ्यांची काळजी घेत माणूसकीचे दर्शन घडविले. मात्र बसगाड्या केव्हा सुरू होणार या प्रतिक्षेत बहुसंख्य प्रवासी सायंकाळनंतर हवालदिल झाले. 

Web Title: Kolhapur News Band effect loss of Rs 40 lakh ST Revenue