दहा रुपयांची नाणी बंद, ही केवळ अफवाच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कोल्हापूर - ""दहा रुपयांची नाणी स्वीकारू नयेत, अशा आशयाच्या कोणत्याही सूचना रिझर्व्ह बॅंकेकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी अशी नाणी गैरसमजातून घरी न ठेवता चलनात वापरावीत,'' असे आवाहन बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक डॉ. सूर्यबहाद्दूर सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

कोल्हापूर - ""दहा रुपयांची नाणी स्वीकारू नयेत, अशा आशयाच्या कोणत्याही सूचना रिझर्व्ह बॅंकेकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी अशी नाणी गैरसमजातून घरी न ठेवता चलनात वापरावीत,'' असे आवाहन बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक डॉ. सूर्यबहाद्दूर सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

गतवर्षी केंद्र सरकारने जुन्या पाचशे व एक हजारच्या नोटांवर बंदी घातली. त्यानंतर काही कालावधीत जुन्या नोटा राष्ट्रीयीकृत बॅंकांतून बदलून देण्यात आल्या. याच कालावधीत दोन हजार व पाचशे रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. त्यानंतर सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले. याच चर्चेचा पुढील भाग म्हणून दहा रुपयांची नाणी बंद झाली, अशी कोणीतरी अफवा उठवली. याचे पडसाद ग्रामीण भागातील आठवडी बाजारात उमटले. किरकोळ विक्रेत्यांकडून नाणी स्वीकारण्यास अनेकदा नकार दिला जाऊ लागला. या पाठोपाठ खासगी प्रवासी वाहतूक व किराणामाल दुकान ते रस्त्यावरील विक्रेत्यांत हाच प्रकार सुरू झाला. 

रोजचा प्रवास व भाजीपाला खरेदीत अशी नाणी घेण्यास नकार येऊ लागले. तेव्हा दहाची नाणी वापरणारे अनेकांत संभ्रम निर्माण झाला. 

या पार्श्‍वभूमीवर दहा रुपयांचे नाणे चालते की नाही याची विचारणा बॅंकेत जाऊन करण्यापेक्षा दहाच्या नाण्याऐवजी दहाची बदली नोट देण्यावर काहींचा भर राहिला. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत काही ठिकाणी दहाची नाणी बंद झाल्याची चर्चा सुरू होती. एसटी महामंडळाचे वाहकांपासून सर्व शासकीय आर्थिक व्यवहारांच्या कार्यालयात सर्वच बॅंकांत मात्र दहाची नाणी घेण्यात येत आहेत. तरीही गैरसमजातून दहाची नाणी देण्याऐवजी अनेकांनी घरीच नाण्यांची साठवण सुरू केली आहे. हे वृत्त बॅंकामध्ये पोचल्यानंतर कांही बॅंकांनी दहा रुपयांची नाणी चलनातून बंद झालेली नसून त्याचा वापर चलनात सुरू असल्याचे सांगणे सुरू केले आहे. 

नोटा किंवा नाणी बंद होण्यापूर्वी तशी सूचना रिर्झव्ह बॅंकेकडून येते. त्याची माहिती बॅंकांतील नोटीस बोर्डवर लावली जाते. दहा रुपयांची नाणी बंद झाल्याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे दहाच्या नाण्यांचा वापर चलनात सुरू ठेवावा. 
- डॉ. सूर्यबहाद्दूर सिंग, शाखा प्रबंधक बॅंक ऑफ इंडिया. 

Web Title: kolhapur news bank of india 10 rupee coin