बास्केटबॉलपटूचा कोल्हापुरात डेंगीने मृत्यू

बास्केटबॉलपटूचा कोल्हापुरात डेंगीने मृत्यू

कोल्हापूर - बास्केटबॉलमधील उदयोन्मुख खेळाडू शिवांजली इंद्रजित रावराणे (वय १५) हिचा डेंगीने मृत्यू झाला. ती गेले काही दिवस या आजाराशी झुंजत होती. अखेरच्या क्षणी एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला गेल्याने आणि वेळीच निदान न झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. 

दरम्यान, तिच्या मृत्यूमुळे शहरातील डेंगीच्या रुग्णांच्या झालेल्या वाढीची तीव्रता अधिक गडद झाली आहे. तीन महिन्यांत शहरात पाचजणांचा डेंगीने मृत्यू झाला. शिवांजली ही छत्रपती शाहू विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. ती उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होती. तिला ताप आल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; पण डेंगीचे निदान लवकर झाले नाही. त्यानंतर एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात अशी धावपळ करावी लागली. दरम्यान, तिचा ताप वाढतच गेला आणि ती बेशुद्ध झाली. रविवारी सकाळी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com