मैं हूं डॉन... मैं हूं डॉन...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - मैं हूं डॉन... अशा गीतांनी भारलेला माहौल आणि त्यातच ‘बच्चनच्या नावानं चांगभलं’ अशा अस्सल कोल्हापुरी गजरात आज ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची पंचाहत्तरी येथील बच्चनवेड्यांनी जल्लोषात साजरी केली. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी चौकात केक कापून आनंदोत्सवही साजरा झाला. शशी गजगेश्वर यांच्यासह बच्चन यांच्या विविध छायाचित्र व कटआऊटस्‌नी सजवलेल्या रिक्षांचा मेळाही येथे भरला. 

छत्रपती शिवाजी चौकात उमर मिरशिकारी यांनी केक तर जयेश ओसवाल यांनी साखर आणली. केक व साखर वाटून आनंदोत्सव झाला. सुभाष गुन्देशा यांनी चहाचे वितरण केले. बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपतर्फे आयोजित बच्चन फिल्म फेस्टिव्हलच्या प्रवेशिका वितरणाला हेमंत स्पोर्टस्‌मध्ये प्रारंभ झाला. ग्रुपचे ॲडमिन सुधर्म वाझे, सरपंच किरण पाटील, राजेश नांद्रे, दीपक घारगे, सचिन मणियार, वासिम जमादार, कुंदन ओसवाल, आम्ही बच्चन ग्रुपचे राजू वेढे, सुभाष घाटगे, रेवती देशपांडे, ज्योती कुमठेकर, स्मिता माने, सुनील शिंदे, अमर जाधव, समीर पंडितराव आदी उपस्थित होते.

डिजिटल फलक
गोकुळ हॉटेलवरही अमिताभ बच्चन यांच्या विविध छायाचित्रांचा भव्य फलक उभारण्यात आला. ‘एबी’प्रेमी कोल्हापुरी ग्रुपच्या वतीने येथे विविध उपक्रमांचे आयोजन झाले. टेंबलाई टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

Web Title: Kolhapur News Big B happy birthday