आजरा नगरपंचायतीवर भाजप-ताराराणीप्रणित शहर विकास आघाडीची सत्ता

रणजित कालेकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

आजरा - जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या आजरा नगपंचायतीवर भाजपच्या सर्वपक्षीय ताराराणी प्रणित आजरा शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह 10 जागा जिंकत बहुमत मिळवले. राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना आघाडीला 6 जागा मिळाल्या. परिवर्तन आघाडीला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले.

आजरा - जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या आजरा नगपंचायतीवर भाजपच्या सर्वपक्षीय ताराराणी प्रणित आजरा शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह 10 जागा जिंकत बहुमत मिळवले. राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना आघाडीला 6 जागा मिळाल्या. परिवर्तन आघाडीला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले.

नगराध्यक्षपदावर शहर विकास आघाडीच्या जोत्स्ना अशोक चराटी यांनी 1506 इतक्‍या मोठ्या फरकाने प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेच्या उमेदवार अलका जयवंत शिंपी यांच्यावर विजय मिळवला. तर अपक्ष उमेदवार शकुंतला सलामवाडे यांनी प्रभाग 16 मधून अनपेक्षीतरित्या विजय मिळवला.

नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या 18 जागांसाठी चुरशीने 82.15 टक्के मतदान झाले होते. आजरा शहर विकास आघाडी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना आघाडी व आजरा परिवर्तन आघाडी यामध्ये जोरदार लढत झाली होती. शहरातील काही प्रभागात अपक्षांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूकीला रंगत आली होती. 18 जागांसाठी 73 उमेदवारांनी अर्ज भरल्याने जोरदार रस्सीखेच होती. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहील्या फेरीत 1 ते 9 प्रभागांची मतमोजणी झाली. या फेरीत नगराध्यक्षपदासाठी ज्योस्त्ना चराटी आघाडीवर होत्या.

त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या 10 ते 17 प्रभागात त्यांची आघाडी वाढत गेली. यावेळीच आजरा शहरविकास आघाडी सत्तेवर येणार हे स्पष्ट जाणवत होते. निकाल जसे हाती आले त्यावेळी मतमोजणी केंद्राबाहेर शहरविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्‍याचीं आतबाजी करत जल्लोष साजरा केला.

प्रभागवार विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते

आजरा शहर विकास आघाडी
अस्मिता समीर जाधव -211 (प्रभाग 1),

आलम अहमद नाईकवाडे - 179(प्रभाग 4),

अनिरुध्द अरविंद केसरकर - 132 (प्रभाग 6),

सिकंदर इस्माईल दरवाजकर - 299 (प्रभाग 10)

अशोक काशिनाथ चराटी -324 (प्रभाग 11),

शुभदा संजय जोशी -270 (प्रभाग 12),

किशोर भाऊ पारपोलकर -389 (प्रभाग 13),

विलास आण्णासो नाईक -212 (प्रभाग 14),

संजीवनी संजय सावंत - 275 (प्रभाग 15).

राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना आघाडी
संभाजी दत्तात्रय पाटील-241 (प्रभाग 2),

सुमैय्या अमित खेडेकर -283 (प्रभाग 3),

यास्मीन याह्याखान बुड्डेखान- 99 (प्रभाग 5),

किरण शंकर कांबळे -336 (प्रभाग 7),

रेश्‍मा इम्रान सोनेखान -358 (प्रभाग 8),

सीमा अशोक पोवार- 289 (प्रभाग 17)

आजरा परिवर्तन विकास आघाडी
यासीराबी इब्राहीम लमतुरे - 429 (प्रभाग 9)

अपक्ष
शकुंतला लक्ष्मण सलामवाडे -244 (प्रभाग 16)

नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्यांना पडलेली मते 
ज्योत्स्ना अशोक चराटी - 4565 (आजरा शहरविकास आघाडी ) विजयी, अलका जयवंत शिंपी - 3059 (राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना आघाडी) पराभूत, स्मिता जनार्दन टोपले - 2468 (आजरा परिवर्तन विकास आघाडी)

Web Title: Kolhapur News Bjp - Tararani alliance win in Ajara