अर्जुनवाड्यात बोअरवेल पुनर्भरण काम सुरू

अर्जुनवाड्यात बोअरवेल पुनर्भरण काम सुरू

सेनापती कापशी - अर्जुनवाडा (ता. कागल) येथे 'पाणी जिरवा'चा पुढील टप्पा सुरू झाला आहे. गावात सुमारे 40 बोअरवेल आहेत. त्याच्या पुनर्भरणाचे काम तरुणांनी हाती घेतले आहे.

साडे चारशे समतल चर, 75 अनगड दगडाचे बांध, सात दगड-मातीचे मोठे बांध येथील श्रमदानात पूर्ण झाले आहेत. त्यासाठी विविध मंडळे, ग्रामस्थ, संघटना, संस्थांचे कर्मचारी, राजकीय नेते यांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. वाढत्या सहभागामुळे येथील तरुणांचा उत्साह वाढला. अजूनही हे सुरूच ठेवले आहे. कामाचा पुढील भाग म्हणून गावच्या हद्दीतील बोअरवेल पुनर्भरण त्यांनी हाती घेतले आहे.

सुरवातीला मंगल कुंभार याच्या बोअरचे काम सुरू केले आहे. त्याला  आवश्यक असलेली जाळी व इतर खर्चासाठी लागणारे सुमारे 1200 रुपये बोअर मालक देत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी तरुण श्रमदान करत आहेत. 

वसंत करवीरकर, गौसलाल देसाई, संभाजी कुंभार, रणजित पाटील, हरी चोपडे, राहुल सातवेकर, तुषार किल्लेदार, विशाल कुंभार, प्रदीप पाटील यांनी या कामात पुढाकार घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com