बोळावीवाडीत ‘जलयुक्त’तून विहीर खोदाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सेनापती कापशी - ‘राजर्षी शाहू महाराजांनी जनतेच्या हितासाठी पाण्याला महत्त्व देऊन धरणे, तलाव, विहिरी बांधल्या. त्यांच्या विचारांचा वारसा जपत जलयुक्त शिवार श्रमदानातून होताना समाधान वाटते,’ असे कौतुक म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

सेनापती कापशी - ‘राजर्षी शाहू महाराजांनी जनतेच्या हितासाठी पाण्याला महत्त्व देऊन धरणे, तलाव, विहिरी बांधल्या. त्यांच्या विचारांचा वारसा जपत जलयुक्त शिवार श्रमदानातून होताना समाधान वाटते,’ असे कौतुक म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

बोळावीवाडी (ता. कागल) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी तरुणांसोबत स्वतः श्रमदान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमावेळी ते बोलत होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अंतर्गत राबवलेल्या येथील उपक्रमात तरुणांचा सहभाग पाहून समाधान वाटते. डॉल्बीला फाटा देऊन तरुण मंडळांनी केलेले श्रमदान गौरवास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून व श्रमदानातून सुरू असलेल्या विहीर खोदाईच्या कामात राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनच्या वतीने मोरया पुरस्कार मिळालेल्या विजेत्या तरुण मंडळांनी पुरस्काराची रक्कम जलयुक्त शिवारसाठी देऊन श्रमदानातही केले. हा आमच्या कामावर व्यक्त केलेला विश्वास आहे. विशेषतः या कामात कागल शहरातील तरुण सहभागी झाले. भैया इंगळे, बॉबी माने, उमेश देसाई, आनंदा मगदूम, दादा कडाकणे, पांडुरंग ढोकरे, युवराज येजरे, तुकाराम कडाकणे आदी उपस्थित होते.

विहिरीचे काम प्रगतीपथावर
येथे सुरू असलेले विहिरीचे काम प्रगतीपथावर असून, सध्या १५ फूट खोल ५० फूट लांब व रुंद असे काम झाले आहे. अजूनही १५ फूट खोलीचे काम शिल्लक आहे. ही विहीर १६ लाख लिटर क्षमतेची असून यातून गावाला कमी खर्चात वर्षभर पाणीपुरवठा होणार आहे. गावाला पाण्याची कमतरता भासणार नाही, असे नियोजन केले आहे.

Web Title: kolhapur news in Bolaviwadi well digging work by youth organisation