इचलकरंजीत मुलगा पंचगंगा नदीत वाहून गेला

राजेंद्र होळकर
सोमवार, 7 मे 2018

इचलकरंजी - येथील पंचगंगा नदी घाटाशेजारी पाण्याच्या अंदाज न आल्याने पोहत असलेला शाळकरी मुलगा नदीत वाहून गेला. समर्थ उर्फ अवंतीकुमार विश्वास तेलवे (वय १६, रा.चौडेश्वरी मंदीराशेजारी, मंगळवार पेठ, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानाच्या मदतीने समर्थ उर्फ अवंतीकुमार च्या शोध घेतला जात आहे.

समर्थ उर्फ अवंतीकुमार याने यंदाच दहावीची परिक्षा दिली आहे. परिक्षा संपल्यानंतर तो दररोज येथील पंचगंगा नदीमध्ये पोहण्यास शिकण्यासाठी मित्राबरोबर जात होता. आज दुपारी अडीचच्या सुमारास नदीमध्ये पोहण्यास मित्राच्या सोबत आला. नदी घाटाशेजारी पोहण्यासाठी म्हणून समर्थ उर्फ अवंतीकुमार नदीमध्ये उतरला. पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहुन जावू लागला. यावेळी त्याने मदतीसाठी मारलेला हाकेने त्याच्या मित्रांनी मोठया धाडसांनी नदीत उड्या मारल्या. पण दोन दिवसामध्ये नदीमध्ये धरणातून मोठयाप्रमाणात पाणी सोडल्याने सध्या नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे त्याला पकडण्यात मित्रांना यश आले नाही. 

दरम्यान यांची माहिती पोलिसांना समजल्याने त्यानी घटनास्थळी धाव घेतली. इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानाच्या मदतीने समर्थ उर्फ अवंतीकुमारचा शोध सुरु केला. सांयकाळपर्यत मिळुन आला नव्हता.  नदीघाटावर समर्थ उर्फ अवंतीकुमार यांचे घरच्या बरोबर मंगळवार पेठेतील नागरिक बसून होते.

Web Title: Kolhapur News boy sink in Panchaganga River