कोल्हापूरातील प्रतिभानगर परिसरात रात्रीच्यावेळी वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कोल्हापूर - दौलतनगर परिसरात वाहनांच्या मोडतोडीचे लोण प्रतिभानगरपर्यंत पोचले. काल रात्री अज्ञाताने रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दौलतनगरात दीड महिन्यांपूर्वी रस्त्यावर लावलेल्या वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली होती. काही वाहने पेटविण्याचाही प्रयत्न झाला होता. एकापाठोपाठ घडणाऱ्या या प्रकारामुळे भागात कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन याबाबत राजारामपुरी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर असे प्रकार थांबले होते; मात्र काल रात्री प्रतिभानगर परिसरात रस्त्यावर लावलेल्या वाहनांची अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. त्यामध्ये महेश केसरकर यांचा टेंपो, राजाराम कांबळे यांची मोटार, सचिन कामरा यांच्या दोन रिक्षांची तोडफोड झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्याचबरोबर दत्तप्रसाद हातीवडे आणि मनोज शिंदे यांच्या दोन मोटारसायकलींची अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकारामुळे नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांवर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी. रात्रीची भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात होती.

Web Title: Kolhapur News break up of Vehicles in Pratibhanagar area