बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड सेवेला केबलचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बीएसएनएलला ब्रॉडबॅण्ड कनेक्‍शन देण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा तुटवडा आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांना ब्रॉडबॅण्ड घेण्यासाठी विलंब होतो. त्यातून हेलपाटे मारण्यापासून विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात ग्राहकांना वेळ काढावा लागत आहे. यात स्थानिक पातळीवर कोणतेच ठोस उत्तर मिळत नसल्याने अनेकजण खासगी कंपन्यांचे ब्रॉडबॅण्ड सेवा घेण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी बीएसएनएलच्या महसुलातील मोठा हिस्सा खासगी कंपन्यांकडे जात आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या सूत्रांनी दिली.     

कोल्हापूर - बीएसएनएलला ब्रॉडबॅण्ड कनेक्‍शन देण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा तुटवडा आहे. त्यामुळे शेकडो ग्राहकांना ब्रॉडबॅण्ड घेण्यासाठी विलंब होतो. त्यातून हेलपाटे मारण्यापासून विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात ग्राहकांना वेळ काढावा लागत आहे. यात स्थानिक पातळीवर कोणतेच ठोस उत्तर मिळत नसल्याने अनेकजण खासगी कंपन्यांचे ब्रॉडबॅण्ड सेवा घेण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी बीएसएनएलच्या महसुलातील मोठा हिस्सा खासगी कंपन्यांकडे जात आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या सूत्रांनी दिली.     

व्यापारी क्षेत्रात कोट्यवधीचे व्यवहार माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे होतात. यात हिशेब व खरेदी-विक्रीचे व्यवहारांच्या नोंदी माहिती तंत्रज्ञानाद्वारे ठेवली जाते. त्यासाठी ब्रॉडबॅण्ड सेवा महत्त्वाची ठरते. त्यामुळे दिवसाला कमीत कमी २० ते ६० ग्राहकांकडून ब्रॉडबॅण्डची मागणी होते. ज्यांच्या घराजवळ किंवा कार्यालयाजवळपास बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड सेवा दिली आहे. तिथे लिंकिंग करूनही असे कनेक्‍शन दिले जाते, मात्र ज्यांचे अंतर ५० फुटांपेक्षा अधिक आहे. अशा ठिकाणी जास्त ऑप्टिकल केबल लागणार असेल, तर तेवढी केबल शिल्लक नाही, असे सांगण्यात येते. 

शहरीकरणात वाढत आहे. उपनगरीय वस्ती वाढली आहे, अशात एखादे कनेक्‍शन दूरवर असेल, तर त्याला जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतराची केबल टाकायची झाल्यास केबल नाही, असे उत्तर येते. शहरातील नागाळा पार्क, कसबा बावडा, देवकर पाणंद, साने गुरुजी वसाहत, मुक्तसैनिक वसाहत अशा ठिकाणी काही अपार्टमेंट झाल्या आहेत. अनेक मोठ्या व्यापाऱ्यांची तिथे निवासस्थाने आहेत, अनेकांना कार्यालयात, दुकानात, बरोबर घरातही ब्रॉडबॅण्ड कनेक्‍शन हवे असते. घरबसल्या लाखो रुपयांची उलाढाल त्यांना करावी लागते, अशांना ब्रॉडबॅण्ड सेवा उपयोगी ठरते.  
ग्रामीण भागातील अनेक सायबर कॅफेला बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड सेवेचा मोठा आधार आहे, मात्र बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड सेवा लवकर मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने काही सायबर कॅफेवाल्यांनाही 
पान २ वर 
बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड सेवेला केबलचे ग्रहण 
 पान १ वरून
खासगी कंपनीचा ब्रॉडबॅण्ड घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील बहुतेक सायबर कॅफे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. प्रवेश अर्ज व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची कामे होतात. त्यासाठी परीक्षा व प्रवेश अर्ज भरण्याच्या काम करता जादा पैसे मोजावे लागतात. 

बीएसएनएलही केंद्र सरकारची कंपनी आहे, आपले पैसे याच कंपनीला मिळावेत, अशी अपेक्षा ठेवून अनेक ग्राहक बीएसएनएलकडे ब्रॉडबॅण्डची मागणी करतात, अनेकांचा तसा आग्रह असतो, मात्र प्रत्यक्ष बीएसएनएलमध्ये गेल्यानंतर केबल नसल्याचे उत्तर मिळते. तेव्हा खासगी कंपनीकडे ग्राहकाला जावे लागते. त्यातून महसूल खासगी क्षेत्राकडे वळतो. वास्तविक केबल किंवा अन्य तांत्रिक साधनसामग्री देण्यात टाळाटाळ होत आहे. यातून बीएसएनएलच्या खासगीकरण करण्याचा किंवा ठेकेदारी पध्दत पाठवून शासकीय अंकुश कमकवुत करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही बीएसएनएलच्या संघटनांनी यापूर्वी केला आहे, असा बीएसएनएल मधील साधनसामग्रीचा अभाव पहाता त्यात तथ्य आहे की काय, अशी शंका ग्राहकांना येत आहे.

लाभ घेण्याची गरज
बीएसएनएलच्या दूरध्वनीपासून मोबाईलपर्यंतची ग्राहकांनी दिली जाणारी सेवाही शुध्द व टिकावू प्रकारच्या साधनसामग्रीतून देण्यात येते. त्यामुळे ध्वनी सेवांचा दर्जाही चांगला (रेंज) मिळतो. तसेच ग्रामीण व दुर्गम भागातही अनेक वर्षे दूरध्वनी सेवा चांगल्याप्रकारे चालवली आहे. त्यामुळे या कंपनीच्या सेवेविषयी लोकांच्या मनात चांगले स्थान आहे, मात्र अलीकडच्या काळात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे केवळ साधनसमग्री नाही, म्हणून काम थांबू नयेत, अशी अपेक्षा आहे केंद्राकडून साधनसामग्री मागवून घ्यायची झाल्यास स्थानिक खासदार राजू शेट्टी व संभाजीराजे छत्रपती लागेल ती मदत मिळवून देऊ, असे अश्‍वासन बीएसएनएलमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहे. त्यांचा लाभ स्थानिक प्रशासन घेणार कधी हाही प्रश्‍न आहे.

Web Title: kolhapur news bsnl broadband service issue