तिसरा वेतन आयोग लागू करण्याची बीएसएनएल कर्मचाऱ्यांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

कोल्हापूर - बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन आयोग लागू करा, यासह विविध मागण्यांसाठी बीएसएनएल अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे येथील ताराबाई पार्क मुख्यालयासमोर निदर्शने केली. 

कोल्हापूर - बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन आयोग लागू करा, यासह विविध मागण्यांसाठी बीएसएनएल अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे येथील ताराबाई पार्क मुख्यालयासमोर निदर्शने केली.

(व्हिडिआे - नितीन जाधव)

भारतीय दुरसंचार निगमतर्फे टेलीफोन, मोबाईल सेवा देण्यात येते. खासगी मोबाईल कंपन्याची संख्या व सेवा वाढल्या आहेत. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देत बीएसएनएलची सेवा सक्षमपणे देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांचा आहे. परंतू नवीन जोडणी देण्यापासून टेलीफोन लाईन दुरूस्तीपर्यंतची कामे करण्यासाठी आवश्‍यक साधन सामुग्री देण्यात चाल ढकल होते. त्यामुळे कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच वेतन वाढ देण्यात चाल ढकल होत आहे. 

वेतनवाढीबाबत संघटनेच्या केंद्रीय समितीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. त्याला एक वर्ष होत आले तरी वेतन वाढ लागू केलेली नाही. त्यामुळे संघटनेतर्फे देशभरातील विविध शाखांत आंदोलन होत आहेत. याचाच भाग म्हणून स्थानीक खासदारांना निवेदन देण्यात आले. दुरसंचार विभागाच्या अखत्यारित वेगवेगळ्या कंपन्या झाल्या. यात व्हीएसएनएल, एमटीएनला या दोन कंपनींचे अस्तीत्व नावापुरतेच उरले आहे. त्यामुळे बीएसएनएल मधील कर्मचाऱ्यांनाही भवितव्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कामे आहेत पण साधणे नाहीत, वेतन पुरेशा प्रमाणात मिळत नाही, मोबाईल कंपन्यात टोकाची स्पर्धा असताना बीएसएनएलच्या सक्षमीकरणा ऐवजी कंपनी कमकवूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते त्वरित थांबले पाहिजे, मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. संघटनेचे सचिव बाळासाहेब कदम, एस. डी. मुरगी, व्ही. जी. दरवाजेकर, दिनकर जाधव आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News BSNL worker union strike